शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजी यंत्रमागाच्या ‘अच्छे दिन’साठी गुजरात निकालाकडे लक्ष,मोदी सरकारकडून सुविधा, सवलतींची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 00:40 IST

इचलकरंजी : गुजरात राज्यातील निवडणुकीनंतर वस्त्रोद्योगाच्या ऊर्जितावस्थेसाठी मोदी सरकारकडून काही सुविधा व सवलती मिळतील.

इचलकरंजी : गुजरात राज्यातील निवडणुकीनंतर वस्त्रोद्योगाच्या ऊर्जितावस्थेसाठी मोदी सरकारकडून काही सुविधा व सवलती मिळतील. त्यामुळे येथील यंत्रमाग उद्योगाला ‘अच्छे दिन’ येतील, अशा अपेक्षेने यंत्रमागधारकांचे लक्ष गुजरात व हिमाचल प्रदेशातील निवडणूक निकालाकडे लागले आहे.गेल्या सुमारे तीन वर्षांपासून यंत्रमाग उद्योगात कमालीची आर्थिक मंदी आहे. त्याचा परिणाम येथील कापड बाजारावर पर्यायाने यंत्रमागधारकांच्या आर्थिक उलाढालीवर झाला आहे. इचलकरंजी शहरातील कापडासाठी अहमदाबाद ही मोठी बाजारपेठ आहे. त्याचबरोबर अहमदाबाद व सुरत ही दोन्ही वस्त्रोद्योगातील मोठी केंद्रे आहेत.गुजरातमधील विधानसभा निवडणुकीत वस्त्रोद्योगाच्या आर्थिक मंदीचा विषय तेथील सत्तारूढ भाजपाला जाणवला आहे. त्यामुळे या निवडणुकीनंतर वस्त्रोद्योगाच्या ऊर्जितावस्थेसाठी मोदी सरकारला यंत्रमाग उद्योगासाठी सुविधा व सवलती देण्याच्यादृष्टीने गांभीर्याने विचार करावा लागेल, अशी आशा येथील यंत्रमाग उद्योजकांना वाटत आहे. दरम्यान, विदर्भ व मराठवाड्यात कापसाच्या पिकावर बोंड अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे बाजारातील कापसाचे दर वाढलेले आहेत.वस्त्रोद्योगाचा सरकारला विचार करावा लागेलगुजरात आणि राजस्थान या दोन्ही राज्यांत कापडाच्या मोठ्या बाजारपेठा आहेत. इचलकरंजी शहर व परिसरातील कोट्यवधींचे कापड दररोज गुजरातमधील अहमदाबाद व राजस्थानमधील पाली-बालोत्रा व जोधपूर या पेठांमध्ये जाते. या दोन्ही राज्यांमध्ये भाजपाचे सरकार सत्तेवर आहे. त्यामुळे साहजिकच वस्त्रोद्योगाला ‘अच्छे दिन’ यावेत म्हणून सरकारला निश्चितपणे विचार करावा लागेल, अशी अपेक्षा इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी यांनी व्यक्त केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPower ShutdownभारनियमनGujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017